खालील वृत्तांत एका सत्य गोष्टीचा सारांश आहे. ही गोष्ट तुम्ही ऐकलेल्या किंवा वाचलेल्या अनेक चांगल्या गोष्टी जशा असतात तशीच आहे, पण जसजशी ही गोष्ट तुम्ही वाचत जाल, तसतसे तुम्हाला जाणवेल की ही फक्त आणखी एक गोष्ट नाही तर हीच खरी गोष्ट आहे. ही गोष्ट आम्ही कोण आहोत व काय बनू शकतो ह्याविषयी विचार करायला लावते.... आणि बरेच काही
ह्या गोष्टीची सुरुवात देवाने होते, जो नेहमीच अस्तित्वात होता,. तो जसा आत्ता आहे, तसाच तो नेहमीपासून आहे. हे गोंधळात टाकणारे वाटू शकते, कारण तो आपल्या आकलनाच्या पलीकडेआहे; कोणीही त्याला संपूर्णपणे समजू शकत नाही.
प्रारंभी देव बोलला व सर्वकाही अस्तित्वात आले. त्याच्या आज्ञेने संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. आकाशातील आकाशगंगा, तारे, ग्रह, आणि पृथ्वी, जिथे एदेन नावाची सुंदर बाग होती. त्याने निर्माण केलेल्या सर्व सौंदर्यात, त्याची सर्वोच्च कलाकृती म्हणजे पुरुष आणि स्त्री होते. देवाने आदाम आणि हव्वेला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले, जेणेकरून ते त्याचे प्रतिबिंब दर्शवतील. त्यांनी देवावर प्रेम करावे, त्याची उपासना व सेवा करावी, त्याच्याशी नाते जोडून अनंतकाळचा आनंद घ्यावाह्या उदात्त हेतूने देवाने त्यांना निर्माण केले.
देवाच्या योजनेनुसारसंपूर्ण सृष्टीत पूर्ण मेळ होता.त्यात कष्ट वेदना, आजार, व मृत्यू नव्हता. तसेच संपूर्ण सृष्टीत प्रेम, विश्वास, आपलेपणा, देव व मानव, आदाम व हव्वा यांच्यात घनिष्ठ नाते होते. परंतु काहीतरी शोकांतिका घडली.
आदाम व हव्वा देवासारखे होण्यापासून खूप दूर होते, तरीही देवाने प्रेमाने त्यांना एदेन बागेत त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे प्रभारी बनवले. देवाने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. आणि एका विशिष्ट झाडाचे फळ खाऊ नये हा एक नियम लावून पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर शासन करण्यास सांगीतले. एके दिवशी, पतन पावलेला स्वर्गदूत सैतान, जो देवाचा शत्रू होता, देवाला पराभूत करू इच्छित होता. त्याने सर्पाचे रूप धारण केले व आदाम, हव्वेला खोटे बोलून” फसवले. त्यांच्या मनात देव चांगला नाही, त्यांच्यासाठी त्याचे उत्तम बेत नाहीत हे विचार टाकलेत. परिणाम स्वरूप त्यांनी जाणून बुजून देवाच्या आज्ञेचा भंग केला. बंड करून आदाम व हव्वेने फळ खाल्ले, आणि हा निर्णय घेतला की, योग्य आणि अयोग्य काय हे ठरवण्याचा अधिकार देवाचा नसून त्यांचा स्वतःचा आहे.
त्यांच्या ह्या कृत्याचा परिणाम अत्यंत विध्वंसकारी होता! एखाद्या विषाणूप्रमाणे पापाचा प्रवेश संपूर्ण सृष्टीत व आदाम हव्वेच्या अंतःकरणात झाला. पाप, क्लेश आणि वेदना पिढ्यांन पिढ्यांत पसरले; संपूर्ण सृष्टी तिच्या मुळ उद्देशापासून विकृत झाली. आम्ही लढाया, गरिबी, आजारपण, शत्रुत्व, स्वार्थ आणि घोटाळे याविषयी ऐकले व वाचले आहे ज्यांनी आपल्या जगाला पोखरले आहे. हे सर्व पापाचे परिणाम आहेत.
जेव्हा आपण सृष्टीच्या प्रारंभी असलेल्या परिपूर्णता आणि प्रेमाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणवते की आपण कल्पनेपेक्षाही अधिक अपूर्ण आणि पापी आहोत. विचार करा—आपण किती वैमनस्य बाळगले आहे, किती वेळा खोटे बोललो आहोत, बोलून न दाखविता येणारे घाणेरडे विचार आम्ही मनांत बाळगतो. जेव्हा आपण प्रामाणिकपणे आपल्या अंतःकरणात डोकावतो, तेव्हा सत्य स्पष्ट होते: आपण सर्व दोषी आहोत. सर्वांनी पाप केले आहे आणि त्याचा अंतिम परिणाम शारीरिक मृत्यूपेक्षा अधिक भयंकर आहे. प्रेमळ देवपित्यांपासून अनंतकाळासाठी अलगाव, भयंकर क्लेश, दुखः ह्या सर्वांमुळे ह्या प्रश्नांवर आम्ही विचार करायला हवा की काय होऊ शकत?
देवाने आदाम व हव्वेच्या पापामुळे त्यांना एदेन बागेतून बाहेर काढले परंतु त्यांना सुटकेचेव आशेचे अभिवचन दिले की त्यांच्या वंशातला एक जण मानवजातीला पापांपासून सोडवेल. त्यानंतरच्या शतकांमध्ये देवाने जगाच्या तारणाऱ्याच्या आगमनासाठी मार्ग तयार केला. त्याच्या ह्या जगात येण्याच्या अनेक शतकांपूर्वीचत्याचा जन्म, जीवन व मृत्युविषयी पवित्र शास्त्रात सुनिश्चीतपणे नोंद करण्यात आली. खरं तर, संपूर्ण पवित्र शास्त्र मानवी इतिहासाचा केंद्रबिंदू म्हणून ह्या एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करते. त्याच्या येण्यामागचाउद्देश होता. हरवलेल्यांना शोधणे व तारणे (लुक १९:१०) मग तो कोण होता?
ज्या तारणाऱ्याचे अभिवचन देण्यात आले होते तो स्वतः परमेश्वर होता. सुमारे २००० वर्षांपुर्वी देव येशू ख्रिस्तामध्ये मानव बनून आला व जुन्या करारातील सर्व भविष्यवाण्या त्याने पूर्ण केल्यात. कुमारीपासून येशूचा जन्म होणे हा एक चमत्कार होता. त्याचे जीवन अद्वितीय होते. पापाविना त्याने देवाचा आनंद पूर्णपणे उपभोगला व त्याच्या आज्ञा पाळल्या. परिणामस्वरूप देवाच्या योजनेप्रमाणे त्याला वधस्तंभावर अत्यंत वेदनादायक मृत्यूमरण सोसावे लागले. त्याने स्वखुशीने आज्ञापालन करून व पूर्णपणे मानवाच्या पापांची खंडणी भरून देण्यांस मरण पत्करले. महान दया व कृपेच्या प्रदर्शनाद्वारे येशूचे जीवन व मरण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी युगानयुगासाठी तारण ठरले.
परंतु कबर त्याला धरून ठेवू शकली नाही. तिसऱ्या दिवशी, देवाने दिलेल्या वचनानुसार, तो मृत्युतून पुनरुत्थित झाला आणि आपल्या पृथ्वीवरील कार्याची पूर्तता केली—वधस्तंभावर मरणाने पापावर विजय मिळवला आणि मृत्युला पराभूत करून कबरेतून बाहेर आला. चाळीस दिवसांनंतर तो स्वर्गात वापस गेला, जेथे तो योग्य हक्कानेराजा म्हणून राज्य करीत आहे.
पण ही गोष्ट येथेच संपत नाही.
फक्त येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने वचन दिले आहे की तो सर्व काही नवीनकरणार. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी संपूर्णतः पाप आणि स्वार्थ मुक्त असेल – असे स्थान जेथे देवासोबत इतरांबरोबर आणि संपूर्ण सृष्टीसोबत पूर्ण मैत्री असेल. विध्वंसक भूकंप, प्रलयंकारी सुनामी किंवा भयंकर वादळे पृथ्वीवर येणार नाहीत. वेदना, दुःख, आजार व मृत्यू कोणीही अनुभवणार नाही.
सर्व काही मूळ योजनेप्रमाणे पुनःस्थापित होईल. जे देवाच्या सुटकेच्या कार्यावर विश्वास ठेवूनत्याच्यावर प्रेम करून त्याची सेवा करून त्याच्याशी संबंध जुळवतात ते सदाकाळचा आनंद उपभोगतील ते त्याच्या महान उद्देशात प्रवेश करतील व देवाच्या मूळउद्देशाची पूर्णता होईल.
ह्या नवीन जगाचे वैशिष्ट म्हणजे आम्ही सदासर्वकाळ देवासोबत असू; संपूर्ण आनंद अनुभवू ज्या देवाने आपली निर्मिती केली, ज्याने आपल्यावर अपार प्रेम केले व जो आपल्यासाठी मरण पावला त्याच्याशी आपले नाते पुनः स्थापित होईल. सी. एस. लुईस. विद्वान आणि बालसाहित्य लेखकह्या नवीन जगात पहिले पाऊल उचलण्याची तुलना करतांना म्हणतात "महान कथेचा पहिला अध्याय जो ह्या पृथ्वीवर कोणीही वाचलेला नाही तो सर्वकाळ चालू राहतो, ज्यांत प्रत्येक अध्याय मागील अध्यायापेक्षा अधिक चांगला आहे."
देव निर्मितीपासून सुरु करून पुनर्स्थापनेपर्यंतची अद्भुत गोष्ट लिहित आहे. त्याने तुम्हाला या गोष्टीचा भाग म्हणून निर्माण केले आहे, जेणेकरून तुम्ही त्याची उपासना करावी, त्याची सेवा करावी आणि त्याच्यासोबतच्या नातेसंबंधाचा आनंद घ्यावा. देवाच्या ह्या गोष्टीचा भाग झाल्यास, तुम्हाला क्षमा, उद्देश आणि संतोष प्राप्त होईल, कारण तुम्ही जीवनाच्या कर्त्याला ओळखले आहे."
विश्वास, सुटकेसाठी फक्त येशू ख्रिस्तावर असलेला साधा आणि निखळ भरोसा आहे. ह्याचा अर्थ पापांच्या परिणामांपासून आपण स्वतःची सुटका स्वतः करू शकतो हा विश्वास न बाळगता येशूने जी सुटका स्वतःचा प्राण देऊन तुमच्यासाठी विकत घेतली त्यावर विश्वास ठेवणेहोय. तुमची निष्ठा इतर कोणावरही नाही तर येशू, जो राजा आहे त्यावर आहे. जे येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात ते स्वतःला त्या प्रेमळ देवापासून ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमची पापांच्या दास्यातून सुटका करण्यास दिले त्या देवापासून सदाकाळासाठी दूर करतात हा दुखःदायी दुरावा नरक आहे.
परमेश्वर भविष्यातील युगांमध्ये ही गोष्ट लिहित राहील, आणि त्याचा एक भाग होण्यासाठी तो तुम्हाला आमंत्रित करीत आहे.. तो आज तुम्हाला तारण देऊ इच्छितो. हीच त्याच्या सुटकेसाठीची तुमची निमंत्रणपत्रिका आहे. तुम्ही ही सुटका सहज स्विकारू शकता.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता क्षणीच तुम्हीदेवाची मुले होता व त्याचा पवित्र आत्मा तुम्हामध्ये वास करू लागतो. तुम्ही त्याच्या ह्या गोष्टीचा एक भाग होता. जसे जसे आपण त्याच्याशी नातेसंबंधांमध्ये वाढत जाल तशी तशी ही गोष्ट जीवनात पाहाल व समजाल. मागील (भूतकाळ) जीवनांत व येणाऱ्या जीवनांत (भविष्यातील) आम्हाला पूर्णपणे स्वीकारण्यात आले आहेत. हा संबंध स्थापित होताच येशू आपल्या जीवनातील चढ-उतार, आनंद आणि कठीण प्रसंगांमध्ये आपल्या सोबत राहण्याचे अभिवचन देतो त्याचे प्रेम चिरस्थायी, न बदलणारे आहे. आणि फक्त अनंतकाळचे जीवन देण्याचे त्याने वचन दिले असे नाही तर तो ह्या जगात ह्यासाठी आला की ह्या जगातही तुम्हाला उद्देशपूर्ण, समाधानकारक आणि मुक्त जीवन अनुभवता यावे.
परमेश्वर भविष्यातील युगांमध्ये ही गोष्ट लिहित राहील, आणि त्याचा एक भाग होण्यासाठी तो तुम्हाला आमंत्रित करीत आहे.. तो आज तुम्हाला तारण देऊ इच्छितो. हीच त्याच्या सुटकेसाठीची तुमची निमंत्रणपत्रिका आहे. तुम्ही ही सुटका सहज स्विकारू शकता.
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता क्षणीच तुम्हीदेवाची मुले होता व त्याचा पवित्र आत्मा तुम्हामध्ये वास करू लागतो. तुम्ही त्याच्या ह्या गोष्टीचा एक भाग होता. जसे जसे आपण त्याच्याशी नातेसंबंधांमध्ये वाढत जाल तशी तशी ही गोष्ट जीवनात पाहाल व समजाल. मागील (भूतकाळ) जीवनांत व येणाऱ्या जीवनांत (भविष्यातील) आम्हाला पूर्णपणे स्वीकारण्यात आले आहेत. हा संबंध स्थापित होताच येशू आपल्या जीवनातील चढ-उतार, आनंद आणि कठीण प्रसंगांमध्ये आपल्या सोबत राहण्याचे अभिवचन देतो त्याचे प्रेम चिरस्थायी, न बदलणारे आहे. आणि फक्त अनंतकाळचे जीवन देण्याचे त्याने वचन दिले असे नाही तर तो ह्या जगात ह्यासाठी आला की ह्या जगातही तुम्हाला उद्देशपूर्ण, समाधानकारक आणि मुक्त जीवन अनुभवता यावे.