खालील वृतांत एका सत्य गोष्टीचा सारांश आहे. आपण एकलेल्या व वाचलेल्या अनेक चांगल्या गोष्टींप्रमाणे ही आहे परंतु जसे आपण ह्या गोष्टीला पुढे वाचत जाल तसे तसे आपल्या लक्षात येईल के ही गोष्ट इत्तर कोणाची नाही पण आमचा परिचय देते. आम्ही कोण आहोत व काय बनू शकतो ह्याविषयी विचार करायला लावते....
ह्या गोष्टीची सुरुवात देवाने होते जो नेहमीच अस्तित्वात होता, जसा आता आहे तसाच प्रारंभा पासून होता. हे सर्व आम्हाला गोंधळात टाकते कारण कि हे आमच्या आकलन शक्ती पलीकडे आहे, कोणीच त्याला समजू शकत नाही.
प्रारंभी देव बोलला व सर्वकाही अस्तित्वात आले . त्याच्या आज्ञेने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आकाशांतील तारे व पृथ्वी सुद्धा. पृथ्वीवर एदेन नांवाचा बाग होता. सर्व सुंदरतेने परिपूर्ण भरपूर श्रेष्ठ कलाकृती स्त्री व पुरुष त्याने निर्माण केले. स्वतःला परावर्तीत करण्यास देवाने आदाम व हव्वेला स्वतःच्या प्रतिरुपांत निर्मिले. त्यांनी देवावर प्रेम करावे, त्याची स्तुति व सेवा करावी, त्याच्याशी संबंध कायम करून आनंद उपभोगावा ह्या उदात्त हेतूने देवाने त्यांना निर्माण केले.
देवाच्या परीकल्पने नुसार संपूर्ण सृष्टीत पूर्ण मेळ होता.त्यात कष्ट वेदना, आजार, व मृत्यू नव्हता. तसेच संपूर्ण सृष्टीत प्रेम,विश्वास , आपलेपणा, देव व मानव, आदम व हव्वे मध्ये घनिष्टता होती. परंतु काहीतरी चुकीचे घडले.
आदम व हव्वा देवातुल्य होण्यापासून फार फार दूर होते, तरी देवाने त्यांना एदेन बागेत जे काही त्याने निर्माण केले होते त्यावर प्रभारी म्हणून नियुक्त केले. देवाने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. विशिष्ट झाडाचे फळ खाऊ नये हा नियम लावून पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर शासन करण्यास सांगीतले. एके दिवशी पतन पावलेला स्वर्गदूत सैतान जो देवाचा शत्रू होता, देवाला पराभूत करू इच्छित होता. त्याने सर्पाचे रूप धारण केले व आदम, हव्वेला खोटे बोलुन फसवले. त्याच्या मनात देव चांगला नाही, त्यांच्या साठी त्याचे उत्तम बेत नाहीत हे विचार टाकलेत. परिणाम स्वरूप त्यांनी जाणून बुजून देवाच्या आज्ञेचा भंग केला. बंड करून आदम व हव्वेने फळ खाल्ले, हा निश्चय घेऊन कि देव नाही परंतु आम्ही स्वतः योग्य व अयोग्य काय ते ठरवु शकतो.
त्यांच्या ह्या कृत्याचा परिणाम फार विध्वंसकारी होता रोग जंतू प्रमाणे पापाचा प्रवेश संपूर्ण सृष्टीत व आदम हव्वेच्या मनात झाला. पाप, क्लेश आणि वेदना पिढ्यांन पिढ्यांत पसरले; संपूर्ण सृष्टी तिच्या मुळ परीयोजने पासून विकृत झाली. आम्ही लढाया, गरिबी, आजार, शत्रुत्व व अश्या इत्तर गोष्टींविषयी ऐकले व वाचले आहे ज्यांनी प्लेग प्रमाणे आमच्या जगाला ग्रासले आहे. हे सर्व पापाचे परिणाम आहेत.
जेव्हा आम्ही परिपूर्णता व प्रेम जे सृष्टीच्या प्रारंभी होते त्याचा विचार करतो तेव्हा आम्हाला कळत कि आम्ही कल्पनेबाहेर बिघडलेले व पापांत पडलेले आहोत. थोडा विचार करा कि आमच्या मनात किती किती वैमनस्य भरलेले आहे, आम्ही किती खोटे बोलतो, बोलून न दाखविता येणारे घाणेरडे विचार आम्ही मनांत बाळगतो. जर प्रामाणिकपणे आम्ही स्वतःच्या अन्तःकरणात डोकावून पहिले तर सत्य प्रगट होईल आम्ही सर्व दोषी आहोत. सर्वांनी पाप केले आहे आणि त्याचा अंतिम परिणाम शारीरिक मृत्यूपेक्षा अधिक भयंकर आहे. प्रेमळ देवपित्यांपासून अनंतकाळासाठी अलगाव, भयंकर क्लेश, दुखः ह्या सर्वांमुळे ह्या प्रश्नांवर आम्ही विचार करायला हवा कि काय होऊ शकत?
देवाने आदम व हव्वेच्या पापामुळे त्यांना एदेन बागेतून बाहेर काढले परंतु सुटका व आशेचे अभिवचन दिले कि त्यांच्या वंशातला एक जण मानवजातीला पापांपासून सोडवेल. त्या नंतरच्या शतकांमध्ये देवाने जगाच्या तारणाऱ्याच्या आगमनासाठी मार्ग तयार केला. त्याच्या ह्या जगात येण्याच्या बऱ्याच शतकाआधी त्याचा जन्म, जीवन व मृत्युविषयी बाईबल मध्ये सुनिश्चीतपणे नोंद करण्यात आली. इतकेच नाही तर संपूर्ण बाईबल मानवी इतिहासाचा केंद्रबिंदू म्हणून ह्या एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करते. येण्यामागे त्याचा उद्देश होता. लुक १९:१० हरवलेल्यांना शोधणे व तारणे. मग तो कोण होता ?
ज्या तारणाऱ्याचे अभिवचन देण्यात आले होते तो स्वतः परमेश्वर होता. २००० वर्षांपुर्वी देव येशू ख्रिस्तामध्ये मानव बनून आला व जुन्या करारातील सर्व भविष्यवाण्या त्याने पूर्ण केल्यात. कुमारीपासून येशूचा जन्म एक चमत्कार होता. त्याचे जीवन अद्वितीय होते. पापाविना त्याने देवाचा आनंद पूर्णपणे उपभोगला व त्याच्या आज्ञा पाळल्या. परिणाम स्वरूप देवाच्या योजनेप्रमाणे त्याला वधस्तंभावरचे अतिवेदनापूर्ण मरण सोसावे लागले. त्याने स्वखुशीने आज्ञापालन करून व पूर्णपणे मानवाच्या पापांची खंडणी भरून देण्यांस मरण पत्करले. महान दया व कृपेच्या प्रदर्शनाद्वारे येशूचे जीवन व मरण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी युगानयुगासाठी तारण ठरले.
पूर्ण निष्कलंक येशू आशारहित अपराध्यांना पापांपासून व सैतानापासून सुटका देण्यासाठी मरण पावला. परंतु कबर त्याला धरून ठेऊ शकली नाही तिसऱ्या दिवशी देवाने दिलेल्या वचनाप्रमाणे तो पृथ्वीवरचे आपले कार्य पूर्ण करून वधस्तंभावरच्या मृत्युद्वारे पापाला व मृत्युला पराभूत करून मृत्युतून जीवंत झाला व कबरेतून बाहेर निघाला. चाळीस दिवसांनंतर तो स्वर्गात वापस गेला जेथे तो राजा म्हणून राज्य करीत आहे.
गोष्ट येथेच थांबली नाही ...
फक्त येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने वचन दिले आहे कि तो सर्व काही नवे करणार जेथे स्वार्थ नसणार – असे स्थान जेथे देवासोबत स्वतःबरोबर आणि संपूर्ण सृष्टी सोबत पूर्ण मैत्री असेल. विध्वंस करणारे भूकंप, सुनामी, भयंकर वादळे पृथ्वीवर येणार नाहीत. वेदना , ह्रदयाला भग्न करणारे , आजार व मृत्यू कोणाला त्रास देणार नाही.
सर्व काही पूर्व योजनेप्रमाणे पुनःस्थापित होईल. जे देवाच्या सुटकेच्या कार्यावर विश्वास ठेउन त्याच्यावर प्रेम करून त्याची सेवा करून त्याच्याशी संबंध जुळवतात ते सदाकाळचा आनंद उपभोगतील ते त्याच्या महान उद्देशात प्रवेश करतील व देवाच्या मूळउद्देशाची पूर्णता होईल.
ह्या नवीन जगाचे वैशिष्ट म्हणजे आम्ही सदासर्वकाळ देवासोबत असू; संपूर्ण आनंद अनुभवू – ज्या देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली , ज्याने आमच्यावर अपार प्रेम केले व जो आमच्यासाठी मरण पावला त्याच्याशी आमचे नाते पुनः स्थापित होईल सी. एस. लुईस. विद्वान व लेकरांचे लेखक ह्या नवीन जगांत पहिल्या पाऊलाची तुलना करतांना म्हणतात "महान कथेचा पहिला अध्याय जो ह्या पृथ्वीवर कोणीही वाचलेला नाही तो सर्वकाळ चालू राहतो, ज्यांत प्रत्येक अध्याय मागील अध्यायापेक्षा अधिक चांगला आहे."
देव निर्मिती पासून सुरु करून पुनःनिर्मिती पर्यंतची आश्चर्यकारक गोष्ट लिहित आहे. त्याने तुमची निर्मिती ह्या गोष्टीचा तुम्ही एक भाग होऊन त्याची उपासना, सेवा व संगतीचा आनंद उपभोगावा म्हणून केली आहे. देवासोबत ह्या गोष्टीचा एक भाग होऊन जीवनाच्या कर्त्याला ओळखण्याद्वारे आपणाला क्षमा, उद्देश आणि संतुष्टी प्राप्त होईल.
विश्वास, सुटकेसाठी फक्त येशू ख्रिस्तावरचा साधा भरोसा आहे. ह्याचा अर्थ पापांच्या परिणामांपासून आपण स्वतःची सुटका स्वतः करू शकता हा विश्वास न बाळगता येशूने जी सुटका स्वतःचा प्राण देऊन तुमच्यासाठी विकत घेतली त्यावर विश्वास स्थानांतरीत करणे होय. तुमची निष्टा इतर कोणावर हि नाही तर येशू जो राजा आहे त्यावर आहे जे येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कश्यावरही विश्वास ठेवतात ते स्वतःला प्रेमळ देवापासून ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमची पापांच्या दास्यातून सुटका करण्यास दिले त्या देवापासून सदाकाळासाठी दूर करतात हा दुखःदायी दुरावा नरक आहे.
भावी युगांत परमेश्वर ही गोष्ट लिहित राहणार आहे, ह्या गोष्टीचा एक भाग होण्यास तो आपल्याला आमंत्रित करीत आहे. तो आपणास तारण देऊ इच्छित आहे. तो देत असलेली सुटका प्राप्त करण्यास आपणांस आमंत्रण आहे. आपण ही सुटका स्विकारू शकता:
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता क्षणीच आपण त्याची मुले होता व त्याचा पवित्र आत्मा आपणामध्ये वास करू लागतो . आपण त्याच्या ह्या गोष्टीचा एक भाग होता. जसे जसे आपण त्याच्याशी संबंधांमध्ये वाढत जाल तशी तशी ही गोष्ट जीवनात पाहाल व समजाल. मागील (भूतकाळ) जीवनांत व येणाऱ्या जीवनांत (भविष्यातील) आम्हाला पूर्णपणे स्वीकारण्यात आले आहेत. हा संबंध स्थापित होताच येशू आपल्या जीवनातील उतार चढाव, समस्या, संकटे, व आनंदात सोबत राहण्याचे अभिवचन देतो त्याचे प्रेम चिरस्थायी, न बदलणारे आहे. त्याने फक्त अनन्तकालच्या जीवनाचेच अभिवचन दिले नाही तर तो ह्या जगात ह्या साठी आला कि ह्या वर्तमान जीवनात आपण उद्देश, परिपूर्ती व स्वातंत्र्य अनुभवावे.