भावी युगांत परमेश्वर ही गोष्ट लिहित राहणार आहे, ह्या गोष्टीचा एक भाग होण्यास तो आपल्याला आमंत्रित करीत आहे. तो आपणास तारण देऊ इच्छित आहे. तो देत असलेली सुटका प्राप्त करण्यास आपणांस आमंत्रण आहे. आपण ही सुटका स्विकारू शकता:
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता क्षणीच आपण त्याची मुले होता व त्याचा पवित्र आत्मा आपणामध्ये वास करू लागतो . आपण त्याच्या ह्या गोष्टीचा एक भाग होता. जसे जसे आपण त्याच्याशी संबंधांमध्ये वाढत जाल तशी तशी ही गोष्ट जीवनात पाहाल व समजाल. मागील (भूतकाळ) जीवनांत व येणाऱ्या जीवनांत (भविष्यातील) आम्हाला पूर्णपणे स्वीकारण्यात आले आहेत. हा संबंध स्थापित होताच येशू आपल्या जीवनातील उतार चढाव, समस्या, संकटे, व आनंदात सोबत राहण्याचे अभिवचन देतो त्याचे प्रेम चिरस्थायी, न बदलणारे आहे. त्याने फक्त अनन्तकालच्या जीवनाचेच अभिवचन दिले नाही तर तो ह्या जगात ह्या साठी आला कि ह्या वर्तमान जीवनात आपण उद्देश, परिपूर्ती व स्वातंत्र्य अनुभवावे.
Request Received!
पवित्र शास्त्र बाईबल देवाचे वचन त्याचे लोकांबद्दल प्रेम व विश्वासुपणाची गोष्ट आहे. ते आम्हाला उत्तेजन, शिक्षण, ताकीद (सूचना) आणि सुधारणा ह्यासाठी मार्गदर्शन व साहाय्य पुरवते. वाचत असतांना देवाजवळ साहाय्य मागा कि त्याने त्यातून जीवनांस लागू करण्यास योग्य असे काही आपणांस द्यावे. वाचन कुठून सुरु करावे हे जर कळत नसेल तर नविन करारांतील मार्ककृत शुभवर्तमानांपासून सुरु करा.
देवाच्या सुटकेच्या कार्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे अश्या लोकांशी जुळणे फार आवश्यक आहे. मंडळी “ख्रिस्ती लोकांचा असा समूह आहे जो देवाच्या कुटुंबाच्या रूपांत त्याची उपासना करण्यांस निरंतर एकत्रित होतो”. त्यात प्रत्येक सदस्य महत्वाची भूमिका पार पाडतो. ज्या प्रकारे मानवाच्या शरीराचे प्रत्येक अवयव संपूर्ण शरीराच्या कार्यासाठी पूरक असतात. मंडळी ख्रिस्ताचा अवयव आहे.
देवाला जाणुन घेण्याचा अजून एक मार्ग आहे. त्याच्याशी संभाषण (वार्तालाप) करणे. तो नेहमी आमचे ऐकण्यांस व आमच्या सोबत संगती करण्यास तयार असतो. आम्ही कधीहि त्याच्याशी बोलून त्याला आपल्या सर्व समस्या, गरजा, ओझे, दुखः, आनंद, सांगावेत, ह्यासाठी तो आम्हांला आमंत्रित करतो. ‘ही प्रार्थना आहे’.
ही बातमी सर्वांना सांगा. देवाच्या प्रेमाची व सुटकेची आश्चर्यजनक गोष्ट व त्याने तुमचे जीवन कसे बदलले.